Saturday, April 5, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeराजकीयजळगाव लोकसभेच्या महिला आघाडीच्या समन्वयकपदी शितल चिंचोरे यांची निवड; शिवसेना नेते गुलाबराव...

जळगाव लोकसभेच्या महिला आघाडीच्या समन्वयकपदी शितल चिंचोरे यांची निवड; शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार !

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने म्हसावद येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शितल दिपक चिंचोरे यांची शिवसेनेच्या जळगाव लोकसभेच्या महिला आघाडीच्या समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे. निवड पत्रावर शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, डॉ. मनीषा कायंदे, शिवसेनेच्या नेत्या सौ. मीनाताई कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. वंदनी हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या निवडीबद्दल शिवसेनेचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, रावसाहेब पाटील, वासुदेव पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिताताई कोल्हे – माळी, यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular