Sunday, April 6, 2025
spot_img
38.3 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeराजकीयजनतेचा असलेला प्रचंड प्रतिसाद आणि भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ -...

जनतेचा असलेला प्रचंड प्रतिसाद आणि भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ – गुलाबराव पाटील

कुसुंबा – चिंचोली – धानवड – उमाळा व परिसरात सर्वसामान्यांचा गुलाबराव पाटलांना भक्कम पाठींबा

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

जळगाव, शिवसेनेचे नेते महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी राजकीय जीवन जनतेच्या सेवेसाठी अर्पण केले असून त्यांच्या कार्यात लोकांच्या कल्याणाची भावना कायम अग्रस्थानी ठेवल्याने जनतेचा हा विश्वास आणि पाठींबा फक्त शब्दात नाही तर प्रत्यक्षात त्यांच्या दररोजच्या भव्य रॅल्यांमध्ये दिसून येत होता. चिंचोली – धानवड – उमाळा – कंडारी , देव्हारी – कुसुंबा भागात गुलाबभाऊंचा विकास बोलतोय अशी भावना आम जनतेमधून उमटत आहे. दररोजच्या भव्य रॅल्यांमध्ये मला मिळत असलेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद आणि भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी जनतेशी संवाद साधतांना केले. यावेळी माजी महापौर ललित कोल्हे, जिल्हाध्यक्ष ह.भ.प. जळकेकर महाराज, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, सरिताताई कोल्हे – माळी, जि.प. चे उपाध्यक्ष लालचंद पाटील होते

कुसुंबा व परिसरात भव्य रॅलीनंतर चौका – चौकांमध्ये मध्ये ग्रामस्थांशी गुलाबराव पाटील यांनी संवाद साधला असता प्रत्येक चौकात “गुलाबभाऊ आम्ही तुमच्या सोबत’ असून -सुरेशदादा नगरसह कुसुंबा वासीय तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहोत.” अशी हमी दिली.

असा नेता होणे नाही – जनसामान्याची भावना
चिंचोली, धानवड, आणि कुसुंबा परिसरात गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासाचे प्रत्यक्ष परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत. रस्ते सुधारणा, पुलांचे काम, पाणी पुरवठा योजना, बेघरांना कायमस्वरूपी जागा देवून शेकडोंचा घरकुल प्रश्न मार्गी लावला आणि शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफार्मर, विविध सोयी-सुविधा यांमध्ये झालेला बदल हा त्या विकासाचा जिवंत पुरावा असून गुलाब भाउंचा विकास कार्यातला संकल्प लोकांपर्यंत पोहोचतोय. त्यांचे असलेले कट्टर समर्थक, लोकांच्या डोळ्यातला आदर आणि आशीर्वाद यांमुळेच गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाला एक विशेष स्थैर्य मिळाल्याने असा नेते होणे नाही ही भावना जन सामन्यात दिसून आली.

यांची होती उपस्थिती
या परिसरात निघालेल्या भव्य रॅल्यांमध्ये स्थानिक सेनेचे शिवराज पाटील, अनिल भोळे, देविदास कोळी, विजय लाड, भाजपाचे हर्षल चौधरी, मनोहर पाटील, रघुनाथ चव्हाण, नाना वाघ, गोकुळ महाजन, मयूर महाजन संजय घुगे, जितु घुगे, अतुल घुगे,मनोज घुगे, मिलिंद लाड , जितु पोळ, ब्रिजलाल पाटील, संभाजी पवार, राजू पाटील, शिवा मांडे, विलास घुगे, शिवाजी मांडे, संदीप बिर्हाडे, योगेश सोनावणे, सुनील लाड, संदीप लाड, नंदूआबा पाटील, बबलू पाटील, कैलास बिर्हाडे , प्रवीण पाटील, सरपंच यमुनाबाई ठाकरे, भारतीताई पाटील, निलेश ठाकरे, आकाश पाटील, भूषण पाटील, ज्योतीताई पोळ, ज्योतीताई शिवदे, अंकुश मोरे , कैलास कोळी, चंद्रकांत पाटील, फिरोज तडवी, विजय पाटील, मगन पाटील, रायपूर येथील सरपंच रजनीताई सपकाळे, प्रवीण परदेशी, सिताराम परदेशी, राजेंद्र परदेशी पुष्पाबाई परदेशी, चेतन परदेशी यांच्यासह परिसरातील सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular