Sunday, April 6, 2025
spot_img
38.3 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeराजकीय..तर जळगाव जिल्ह्यातील बंडखोरांसाठी भाजपाची दारे होतील सहा वर्षे बंद?

..तर जळगाव जिल्ह्यातील बंडखोरांसाठी भाजपाची दारे होतील सहा वर्षे बंद?

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज (दि ४) शेवटचा दिवस असल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांपुढे बंडखोरी थांबवण्याचे मोठे आव्हान समोर आहे. दरम्यान महायुतीमधील काही उमेदवारांनी नाराज होऊन अर्ज भरले आहेत. त्यांची समजूत काढण्यात येणार असून जे उमेदवार ऐकणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. अशा न ऐकणाऱ्या उमेदवारांना सहा वर्षे भाजपाची दारे बंद होतील असा इशारा देखील चंद्रशेखर बावनकुळे दिल्याने खळबळ उडाली.

विधानसभेच्या जळगाव शहर मतदारसंघात भाजपचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे आणि माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी त्यांच्याच पक्षाचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

पाचोरा मतदारसंघातही भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात यंदा दुसऱ्यांदा अपक्ष उमेदवारी दाखल केला आहे. गेल्या वेळीही अमोल शिंदे यांनी आमदार पाटील यांना अपक्ष उमेदवारी करून कोंडीत पकडले होते. एरंडोलमध्ये भाजपचे माजी खासदार ए.टी.पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या विरोधात अपक्ष अर्ज दाखल करून महायुतीची डोकेदुखी वाढवली आहे. अमळनेरमध्ये भाजप समर्थक माजी आमदार शिरीष चौधरी यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यातून काही उमेदवार आज माघार घेणार असल्याचे समजते आहे. मात्र मात्तब्बर उमेदवारांच्या पराभवाचा चंग काही अपक्ष उमेदवारांनी बांधला असल्यामुळे यंदाच्या मैदानातून अपक्ष माघार घेणार नाही असे जर चित्र असले तर विजयाचे गणित यंदा बदलू शकते.

जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी महायुतीच्या भाजपतर्फे विद्यमान आ.सुरेश(राजूमामा) भोळे, महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे माजी महापौर जयश्रीताई सुनील महाजन, अपक्ष उमेदवार माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी नगरसेवक मयूर कापसे या पाच उमेदवारांपैकी कुणीही माघार घेण्यास तयार नसल्याचे चित्र सध्या तरी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular