
गुलाब भाऊंचे बंजारा महिलांनी पारंपरिक वेशभूषेत बंजारा गीताने केले स्वागत !
लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर
जळगाव – गेल्या अनेक वर्षांपासून गुलाबराव पाटील यांनी तांड्यांच्या विकासावर दिलेले हे योगदान लक्षात घेऊन, बंजारा तांडा वासियांनी ‘गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त मतेशी जीकान लायर’ म्हणजे त्यांना विजयी करण्यासाठी ठाम निर्धार व्यक्त केला आहे. “गुलाबराव पाटील हे आमचे तांड्यांचे खरे संरक्षक आहेत. त्यांच्या नेतृत्वात आमचे सर्व प्रश्न सोडवले जातील,”असा विश्वास तांडा वासियांनी व्यक्त केला.
तांड्याचा सर्वांगीण विकासासाठी दिला भरघोस निधी
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील लोकप्रिय नेते गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध तांड्यांच्या विकासासाठी भरीव योगदान दिले गेले आहे. मतदारसंघातील वसंतवाडी तांडा, विटनेर तांडा, रामदेव वाडी, सुभाष वाडी, लोणवाडी, मोहाडी तांडा आणि धानवड तांडा येथील पाणीपुरवठा योजना मंजूर करून तांड्यांच्या मुलभूत सोयी-सुविधा उभारण्यात त्यांचे विशेष लक्ष राहिले आहे.