Saturday, April 5, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeराजकीयखळबळजनक : जिल्ह्यातील अपक्ष उमेदवारावर गोळीबार ?

खळबळजनक : जिल्ह्यातील अपक्ष उमेदवारावर गोळीबार ?

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

जळगाव – राज्यात राजकीय रणधुमाळी सुरु झाली असून माघारीची अंतिम मुदत देखील काल संपली आहे. तर सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवारांसह अपक्ष उमेदवार देखील प्रचाराच्या मैदानात उतरले आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडविणारी बातमी समोर आली आहे. बोदवड मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांचा बोदवड तालुक्यातील राजूर गावात प्रचार रॅली सुरू असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना दि.५ रोजी दुपारी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत अपक्ष म्हणून विनोद सोनवणे हे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. दरम्यान, मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृती मारोती मंदीरात जावून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यानंतर त्याचा प्रचार दौर बोदवड तालुक्यात सुरू झाला. बोदवड तालुक्यातील राजूर गावात विनोद सोनवणे यांची प्रचार रॅली सुरू असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular