Saturday, April 5, 2025
spot_img
35.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeराजकीय…ग्रामस्थांनी दिलेला विश्वास माझा उत्साह व आत्मविश्वास वाढविणारा – धनंजय चौधरी

…ग्रामस्थांनी दिलेला विश्वास माझा उत्साह व आत्मविश्वास वाढविणारा – धनंजय चौधरी

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

रावेर यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी आज (दि. ६) तालुक्यातील गारबर्डी धरण वस्ती, गारबर्डी – पारसिंग पाडा,- गारबर्डी गजा पाडा -निमड्या -गारखेडा -पाल येथिल ग्रामस्थांशी संवाद साधला.

आदिवासी भागात आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना गावांअंतर्गत पेव्हर ब्लॉक, काँक्रीटीकरण अशी मूलभूत सुविधाची विविध विकासकामे करण्यात आली आहे. येणाऱ्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी हाताचा पंजा या निशाणीसमोरील बटन दाबून निवडणुकीत आपले मतदानरुपी आशीर्वाद देण्याची विनंती ग्रामस्थांना केली. यावेळी ग्रामस्थांनी माझ्या विनंतीला प्रतिसाद देऊन ‘आम्ही कायम सोबत राहू’ असा दिलेला विश्वास माझा उत्साह आणि विजयासाठी आत्मविश्वास वाढवणारा आहे.

यावेळी सरपंच रतन बंगी बारेला, रमेश अमरसिंग बारेला, हरसिंग बारेला, गिरासिंग भंगी, दिलदार गेंद्या, सलीम तडवी, इरफान तडवी, कुर्बान तडवी, नानाभाया गजा पावरा, खुमसिंग गजा पावरा, रामचंद गणा पावरा, श्रीराम देढा पावरा, सुमलाल गणा, महावीर बद्दू भिलाला, अकिल बारेला, पिंटूदादा पवार, युनूस इस्माईल, हमीद शेठ, उमर तडवी, रोनक तडवी, नारायण भोळे, विजय फकिरा महाजन, नारायण घोडके, अशोक महाजन, असलम तडवी, दलशेर तडवी, रवींद्र हिवरे, शैलेंद्र पवार, राजेश पवार, रणजीत पवार, रमेश अमरसिंग बारेला, हरसिंग बारेला, गिरासिंग भंगी, बारेला दिलदार, गेंद्या सलीम तडवी, इरफान तडवी, कुर्बान तडवी, नानाभाया गजा पावरा, खुमसिंग गजा पावरा, रामचंद गणा पावरा, श्रीराम देढा पावरा, सुमलाल गणा महावीर, बद्दू भिलाला, अकिल बारेला, पिंटूदादा पवार, युनूस इस्माईल, हमीद शेठ, उमर तडवी, रोनक तडवी, नारायण भोळे, विजय फकिरा महाजन, नारायण घोडके, अशोक महाजन, असलम तडवी, दलशेर तडवी, रवींद्र हिवरे, शैलेंद्र पवार, राजेश पवार, रणजीत पवार आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular