
लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर
जमदे – भोलाणे गावात घोड्यावरून वरात काढून जोरदार स्वागत करण्यात आले. त्यामुळे 42 खेड्यात त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. अब शिरीष दादा बॅटसे घुमायंगे सिक्सर म्हणत तरुणांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला.
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू असून त्यादरम्यान त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ८ रोजी तालुक्यातील 42 खेड्यातील जामदे-भोलाणे या गावात प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ठिकठिकाणी माता भगिनींनी औक्षण करून आशीर्वाद दिले. ग्रामस्थांनी ही प्रचारात सहभागी होत मोठा प्रतिसाद दिला. यावेळी सर्वात महत्त्वाच्या विषय ठरला तो शिरीष चौधरी यांच्या प्रचारादरम्यान घोड्यावरून गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मिरवणूक काढत वाजत गाजत संपूर्ण गावात जनु मोठा उत्सव साजरा केला. यावरून असे निदर्शनास येते की तालुक्यातील 42 गावात शिरीष चौधरी यांना मोठा पाठिंबा असेल असे दिसून येते. यावेळी माजी सरपंच शिवाजी पाटील, मगन बापू, सरपंच संभाजी पाटील, वसंत नगरचे पप्पू जाधव, हरी कृष्ण पाटील, वाल्मीक पाटील, हिरापूर गोकुळ चौधरी,भीमराव पाटील, बटू आटकर, अर्जुन बिल, अतुल भिल, किशोर पाटील, शिवाजी पाटील, दिनेश पाटील, संदीप पाटील, दीपक पाटील, मनोहर पाटील. इ. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.