Tuesday, April 8, 2025
spot_img
33.7 C
Delhi
Tuesday, April 8, 2025
spot_img
Homeराजकीयमंत्री ना. गुलाबराव पाटील ॲक्शन मोडवर ; शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता

मंत्री ना. गुलाबराव पाटील ॲक्शन मोडवर ; शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

जळगाव : – विधानसभा निवडणुकीची धामधूम आटोपल्यानंतर सरकार स्थापना व खातेवाटप जाहीर झाले आहे. गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कॅबिनेट मंत्री पदाची दुसऱ्यांदा जबाबदारी मिळाली आहे. मात्र खातेवाटप किंवा मंत्रीपदावर वर्णी लागण्याआधीच नंतर गुलाबराव पाटील ॲक्शन मोडवर आले आहेत. निवडणुकीत त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली असून सर्वप्रथम जळगाव तालुक्यातील नांदगाव ते फेसर्डी पिलखेडा नांद्रा फाटा रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.

जळगाव तालुक्यातील नंदगाव फेसर्डी पिलखेडा नांद्रा फाटा हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता मानला जातो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या रस्त्याची बिकट अवस्था झाली होती. सदरची बाब गुलाबराव पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर हा रस्ता लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना दिले होते. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे हे काम आचारसंहितेच्या कचाट्यात अडकले.

आचारसंहिता संपल्यानंतर या रस्त्याचे काम प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन देखील गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले. आपल्या शब्दाला जागत आचारसंहिता संपल्या बरोबर या रस्त्याच्या कामाची नामदार पाटील यांनी सविस्तर माहिती मागून सदर काम पूर्ण करून हा रस्ता तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देखील प्रशासनाने दिले. नामदार पाटील यांच्या आदेशानंतर वेगवान पद्धतीने चक्रे फिरली व या रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सद्यस्थितीत या रस्त्यावर खडीकरण व डांबरीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून यामुळे परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे व समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular