Saturday, April 5, 2025
spot_img
25.9 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeराजकीयपाळधीची ३० कोटींची पाणीपुरवठा योजना पूर्ण; मंत्री गुलाबराव पाटील यांची वचनपूर्ती

पाळधीची ३० कोटींची पाणीपुरवठा योजना पूर्ण; मंत्री गुलाबराव पाटील यांची वचनपूर्ती

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

पाळधी : ना.मंत्री गुलाबराव पाटील यांनी पारधी वासियांना दिलेले वचन पाळत पाळधी येथे ३० कोटी रुपयांच्या सोलर पाणीपुरवठा योजनेच्या वचनाची पूर्ती केली आहे.पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह या ऐतिहासिक योजनेचे संपूर्ण पाहणी करून दर्जेदार पद्धतीने पूर्ण झालेल्या कामाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे होते. म.जी. प्रा. चे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ही सोलरवर आधारित पहिली योजना असून, ३० कोटींच्या निधीतून ती पूर्ण झाली आहे. या योजनेअंतर्गत फिल्टर प्लांटमध्ये दिवसाला ४० लाख लिटर पाणी शुद्ध केले जात असून, ४ हजार ८०० नळ जोडण्याची सुविधा गावांना उपलब्ध झाली आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुकुंदराव नत्रवरे यांनी केले तर आभार सरपंच विजय पाटील यांनी मानले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांचे कौतुक करत सांगितले की, “महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे पुण्य कार्य त्यांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे त्यांना ‘राज्याचे वाटर मॅन’ म्हणून ओळख मिळाली आहे.”याप्रसंगी सरपंच विजय पाटील, शरद कोळी, उपसरपंच दयानंद कोळी, गटविकास अधिकारी अजयसिंग पवार, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जि. प. चे कार्यकारी अभियंता गणेश भोगवाडे, म. जी. प्रा. चे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, उप अभियंता कमलेश झाडे, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील दोन्ही गावाचे ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular