
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
मंत्री गुलाबराव पाटील म्हणजे वॉटर मॅन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
धरणगाव : तालुक्यातील भोद खुर्द येथे पाणीपुरवठा योजनेचे भव्य लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गावकऱ्यांनी, विशेषतः महिलांनी मंत्री महोदयांचे जल्लोषपूर्ण स्वागत करत त्यांच्या कार्याबद्दल कौतुक व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसाद होते. याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी भोद बुद्रूक व भोद खुर्द या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम लवकरच मंजूर करण्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शेकडो योजना मंजूर असून अनेक पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, तर काही प्रगतीत आहेत.
भोद गावाने पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करून एक आदर्श निर्माण केला असत्याबद्दत त्यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले.मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाण्याच्या टाकीजवळ कॉक फिरवून योजनेचे लोकार्पण केले. कार्यक्रमात लाडक्या बहिणींनी मंत्री व लाडके भाऊ गुलाबराव पाटील यांचे स्वागत करून अभिनंदन केले.
जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्यातील यशस्वी योजनांचा उल्लेख करून ‘गुलाबराव पाटील म्हणजे महाराष्ट्राचे वॉटर मॅन आहेत,’ असे मत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त करून त्यांनी ग्रामपंचायतीला पाणीपट्टी वेळेवर वसूल करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकात जि.प.चे कार्यकारी अभियंता गणेश भोगवाडे यांनी योजनेविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन महेंद्रसिंग जाधव यांनी केले, तर आभार उपसरपंच संदीप पाटील यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प.चे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगवाडे, गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, माजी सभापती पी. सी. पाटील, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, सरपंच विजय पाटील, उपसरपंच संदीप पाटील, ग्रा. पं. सदस्य प्रकाश पाटील, बाळू भिल, भाईदास पाटील, हाशिस पठाण, संभाजी पाटील, पितांबर पाटील, हर्षल पाटील, ममता पाटील, रंजना पाटील आणि ग्रामस्थ
