लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
जळगाव: आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणूका महायुतीतर्फे लढविण्याबाबत आम्ही स्थानिक घटकाशी चर्चा करणार आहोत. अशी माहिती राज्याचे ग्रामीण पाणी पुरवठामंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक येथे बोलतांना सांगितले, की आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणूका पक्षाने स्वतंत्रपणे लढवाव्या कि भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाशी महायुती करून लढवाव्या याबाबत प्रथम पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. स्वतंत्रपणे निवडणूका लढविल्यास पक्षाला त्याचा फायदा होईल की नाही याबाबतही आढावा घेण्यात येईल.
जळगाव महापालिकेत ७५ जागा आहेत.याबाबत बोलतांना गुलाबराव पाटील म्हणाले, कि महापालिका निवडणूकीत चांगले यश मळविण्यासाठी महायुती आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी चर्चा करणार आहोत. महायुतीतर्फे महापालिकेच्या निवडणूका लढण्याकडे पक्षाचा कल असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका जाहीर होण्याअगोदर पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या स्थानिक सर्व कार्यकर्त्याशी चर्चा करणार आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत महायुतीने एकत्रीतपणे काम केले होते. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनीही चांगले काम केले होते. त्यामुळे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात तसेच जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार संघात यश मिळवून महायुतीने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हापरीषद तसेच पंचायत समिती निवडणूकीत महायुती कायम रहावी अशी शिवसेनेची अपेक्षा असल्याचे मतही पाटलांनी व्यक्त केले.