लोकशक्ती न्यूज |नितीन ठाकूर|
जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथील गतिमंद मुलीचे पालकत्व स्वीकारत मंत्री गुलाबराव पाटील यांनी तिच्या विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च उचलला. वधू निकिता संतोष कोथळकर हिचा विवाह जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरातील मनोज वसंत काटोले याच्याशी जमविला. सतोष हा जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. रविवारी (१९ जानेवारी) या जोडप्यांचा विवाह शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्कसमोर पाचदेवी मंदिरावर थाटात झाला. या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, श्याम कोगटा, नवलसिंग पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी वधुवरांना आशीर्वाद दिले.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी डीपीडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासाला नवीन उंचीवर नेऊन, दोन वेळा 100% निधीच्या प्रभावी खर्चाचे यशस्वी उदाहरण प्रस्थापित केले आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली अतिशय सूक्ष्म नियोजन, सर्वपक्षीय आमदारांशी सौहार्दपूर्ण संबंध, अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य व प्रोत्साहन देऊन काम करण्याची संधी आणि जनहिताचे उपक्रम राबवण्याचा त्यांचा दृष्टिकोन आदर्शवत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणे हे त्यांच्या नेतृत्वगुणांचे आणि कार्यक्षमतेचे प्रतीक आहे.गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या कामाचा ठसा अविस्मरणीय आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी उभारलेला प्रयत्न निश्चितच अनुकरणीय आहे.तिसऱ्यांदा पालकमंत्री होण्याच्या या सन्मानामुळे जळगाव जिल्ह्याच्या जनतेचे आत्मविश्वास आणि आशा अधिक बळकट झाल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा विकास आणखी वेगाने होईल, अशी जनसामान्यांना खात्री आहे