Saturday, April 5, 2025
spot_img
27.2 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeराजकीयसावखेडा ते धरणगाव हायवेमुळे या भागाचा चेहरा बदलणार

सावखेडा ते धरणगाव हायवेमुळे या भागाचा चेहरा बदलणार

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

सावखेडा / धरणगाव : सावखेडा ते  धरणगाव हायवे हा केवळ एक रस्ता नसून, या भागातील जनतेसाठी विकासाच्या नव्या संधी निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे. हायब्रीड अॅन्युटी योजनेच्या माध्यमातून रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण होईल, तसेच हायब्रीड अॅन्युटी योजनेच्या माध्यमातून निधीची उपलब्धता सुनिश्चित असून, रस्ता दर्जेदार आणि वेळेत कॉण्ट्रॅक्टरने पूर्ण करावा. दळणवळणाचे साधन म्हणजे विकासाची गती असून हा रस्ता या भागातील शेती, व्यापार आणि सामाजिक जीवनात सकारात्मक बदल घडवेल. त्यामुळे दर्जेदार रस्त्यामुळे दळणवळण अधिक सुलभ होईल, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

गुलाबराव पाटील यांच्या हस्ते राज्य शासनाच्या निधीतून सावखेडा-धरणगाव हायवेच्या ११० कोटींच्या२० किमी लांबीच्या रस्त्याच्या काम ाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विभागाचे कार्यकारी अभियंता शेख इब्राहिम, ठेकेदार ललित चौधरी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.प्रास्ताविक व सूत्रसंचालन कैलास माळी यांनी केले तर आभार कार्यकारी अभियंता शेख इब्राहिम यांनी भूमिपूजनामुळे भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, भाजपाचे सुभाष पाटील, शेखर अत्तरदे, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, डी. जी. पाटील, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, अॅड. संजय महाजन, उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, जि. प. सदस्य गोपाल चौधरी, शहरप्रमुख विलास महाजन, नपाचे गट नेते पप्पू भावे, भाजपचे कैलास माळी, नगरसेवक विजय महाजन, वासुदेव चौधरी, बुठ्या पाटील, भगवान महाजन, अनिल पाटील, भानुदास विसावे, राजेंद्र पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular