
शेवगाव प्रतिनिधी
सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रतापकाका ढाकणे यांना या वेळी विधानसभेत पाठवण्याचा सर्वांचा निर्धार आहे, आणि काकांना आमदार केल्या शिवाय शेवगाव-पाथर्डी मधून मी फेटा बांधनार नाही,काका आमदार झाल्या नंतर पहिला फेटा मला बांधा असे प्रतिपादन नगर दक्षिण चे खासदार निलेश लंके यांनी केले,ते दि १८ रोजी शेवगाव येथे प्रताप ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते.
खासदार निलेश लंके पुढे म्हणाले की,स्व.बबनरावजी ढाकणे यांनी या भागात अनेक विकासकामे केली, संघर्षाच्या बळावर अगदी शुन्यातून सुरवात करत त्यांनी केंद्रीय मंत्री पदाला गवसणी घातली त्याच संघर्षाचा वारसा प्रतापकाका पुढं नेत आहेत,काका अगदी निर्मळ मनाचा माणूस असून साऱ्यांना सोबत घेऊन पुढं जाण्याची काकांची भूमिका असते, शेवगाव पाथर्डी विकासाच्या दृष्टीने मागं आहे,हा विकासाचा बॅक लॉग भरुन काढण्यासाठी माझ्या सोबतीला काका द्या आम्ही दोघे मिळून या भागाचा कायापालट केल्या शिवाय थांबणार नाही, त्याचबरोबर या वेळी राज्यात परिवर्तन घडून येणार असून महाविकास आघाडी चे सरकार येणार आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून काकांना विधानसभेत पाठवायचा निर्धार आपण सर्वजण करू असे खासदार लंके यांनी म्हटले आहे.
प्रतापकाका ढाकणे यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेवगाव येथील खंडोबा मैदानात अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता, या वेळी ख्यातनाम गीतकार आनंद शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला, या प्रसंगी प्रतापकाका यांच्या आयुष्यावर गीत लॉन्च करण्यात आले, त्याचबरोबर दिनांक २७ जुलै रोजी पाथर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यासाठी पुर्व नोंदणी करण्यासाठी वेब साईट सुरू करण्यात आली.
वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला व आपल्या सत्काराला उत्तर देताना ॲड प्रतापकाका ढाकणे म्हणाले की निलेश सारखा लहान भाऊ माझ्या सोबत आहे त्यामुळे मी कुणालाही घाबरत नाही, सर्व सामान्य माणसानं ठरवलं तर इतिहास घडतो,जसा या वेळी आपल्या लोकसभा मतदारसंघात घडला, आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभा लढवण सोपं नव्हतं पण हे धाडस निलेश नी दाखवल आणि आपण सर्वांनी मिळून त्याला विजयी केले, शेवगाव पाथर्डी च्या विकासासाठी मला एक संधी द्या निलेश आणि मी आम्ही दोघे मिळून या भागात परिवर्तन घडवून आणू असे प्रतापकाका यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवराव काटे यांनी केले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे शेवगाव तालुका अध्यक्ष श्री हरिष भारदे, पाथर्डी तालुका अध्यक्ष श्री शिवशंकर राजळे यांच्या सह अनेक मान्यवर – कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.