
कांबी प्रतिनिधी अमोल म्हस्के
तालुक्यात अद्याप जोरदार पाऊस जरी नसला, तरी मध्यम व रिमझिम स्वरूपाच्या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे खरिपातील,कापूस,तूर,मूग,बाजरी,या पिकांना नवजीवन प्राप्त झाले असून, या पिकांमध्ये आंतमशागतीसह पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसून येत आहेत.शेवगाव तालुक्यात यंदा जूनच्या पहित्याच आठवड्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची, कापूस, तूर, मूग बाजरी,या पिकांची पेरणी केली.
“दरम्यान, तालुक्यात अद्याप जोरदार पावसाने जोर धरला नसला, तरी सतत पावसाळ्यात दीड महिना उलटूनही शेतात पाणीसुद्धा साचले नाही. असाच पाऊस राहित्यास उत्पादनात कमी-अधिक प्रमाणात फरक पडेल, त्यामुळे जास्तीत-जास्त उत्पादनवाढीसाठी जोरदार पावसाची गरज आहे. बियाणे, खत पाचा झालेला खर्चदेखील मिळणार नसत्याची परिस्थिती आहे.” – बाळासाहेब राजपुत शेतकरी कांबी
रिमझिम, मध्यम स्वरूपाच्या पावसाचा जोर कायम आहे. त्यातच ढगाळ वातावरण व दिवसातून पाऊस येताच अशी परिस्थती निर्माण झाल्यामुळे जमिनीवरून उगवून वर
आलेल्या या पिकांना त्याचा फायदा झाला. मात्र, गवताचे प्रमाण वाढले असले, तरी कमी-अधिक प्रमाणात झालेल्या उघडिपीत शेतकऱ्यांनी त्यात आंतरमशगात म्हणून कोळपे मारणे, औताच्या पाळ्या मारणे, खुरपणी करणे, खतांची मात्रा देणे, ढगाळ वातावरणाचा परिणाम त्यावर होऊ नये, यासाठी कीटकनाशके व बुरशीनाशकांच्या फवारण्या करणे यांसह अनेक कामांमध्ये
शेतकरी व्यस्त दिसून येत आहे. पाऊस मध्यम व रिमझिम स्वरूपात पडत आहे. या पावसामुळे नदी-नाले, ओढ्यांना पाणी आले नाही. त्यामुळे सिंचन प्रकल्पांत पाहिजे तसा पाणीसाठा अद्याप झाला नाही,बोर विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे जोरदार पावसाची अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.