Sunday, April 6, 2025
spot_img
29.2 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeक्राइमरावेरमध्ये व्यापाऱ्यांची ऑनलाईन ११ लाख ७९ हजाराची फसवणूक

रावेरमध्ये व्यापाऱ्यांची ऑनलाईन ११ लाख ७९ हजाराची फसवणूक

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेंडींगमध्ये जास्तीचा नफा मिळवून देतो असे सांगून रावेर तालुक्यातील एका व्यापाऱ्याची ५ लाख ७९ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शेअर ट्रेंडिंगच्या नावाखाली फसवणूक सुरूच असून यापूर्वीदेखील जळगावात अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहे.

राहूल विठ्ठल पाटील (वय ३५ रा. मोरगाव ता. रावेर) हे व्यापार करून उदरनिर्वाह करतात. दि. २३ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरच्या दरम्यान त्यांच्या व्हॉटसअॅपवर श्रृती अग्रवाल आणि दामोदर अग्रवाल असे नावे सांगणाऱ्या दोघांनी ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेंडींगमधून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून अॅप डाऊनलोड करण्यास सांगून भरलेले पैशांवर त्यांनी काही परतावा दिला. त्यामुळे त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर दोघांनी त्यांच्या खात्यातून ५ लाख ७९ हजार रूपये परस्पर काढून घेतले. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राहूल पाटील यांनी मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासपोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular