
विदगाव व परिसरात भाऊबीजेला शेकडो बहिणींनी केले औक्षण
लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर
जळगाव, भाऊबीज हा सण बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, आणि यावर्षी, महायुतीचे उमेदवार व शिवसेना नेते, मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांनाविदगाव- फुपणी – गाढोदा परिसरातील शेकडो लाडक्या बहिणींनी स्नेहपूर्वक औक्षण केले. गुलाबभाऊ आमच्यासाठी फक्त राजकीय नेते नाहीत, तर खरेखुरे भाऊ आहेत, ज्यांनी गावातील प्रत्येकाच्या हितासाठी आपले जीवन समर्पित केले आहे.’ ”या औक्षणाच्या सोहळ्यात बहिणींनी आपल्या गुलाब भाऊंच्या विजयाची प्रार्थना करत, “गुलाबभाऊंचा विजय हीच आमच्यासाठी भाऊबीजेची खरी भेट असेल,” असे सांगून “आम्ही सर्व बहिणी गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार असल्याचे भावनिक उद्गार व्यक्त केले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. प्रमुख ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, रिपाईचे अनिल अडकमोल, महिला आघाडीच्या सरिता ताई कोल्हे – माळी आदी सोबत होते.