
लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर
रावेर यावल विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी आदिवासी भागात प्रचार करतांना तेथील नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले की तुमच्या आशीर्वादाने आणि महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणुन निवडणुक लढवत आहे. मतदार संघातील विविध प्रश्न विधि मंडळात मांडून त्यांची सोडवणुक करून रावेर यावल मतदारसंघाचा विकास घडविण्यासाठी मी बांधिल राहील त्यासाठी हाताचा पंजा या चिन्हा समोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद देण्याची विनंती त्यांनी केली..