Saturday, April 5, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeराजकीयखडसे यांचा आमदारांवर गंभीर आरोप..

खडसे यांचा आमदारांवर गंभीर आरोप..

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जुलै ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील विविध गावात स्वखर्चातून शेतरस्त्यांचे मुरुमीकरण केले होते. या कामामुळे परिसरातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु हे मुरुमीकरण स्व:खर्चातून न करता शासकीय निधीतून केले गेल्याचा धक्कादायक खुलासा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी विद्यमान आमदारांवर आरोप केला आहे.रोहिणी खडसे या रावेर तालुक्यातील गहुखेडा गावात शेतकऱ्यांसमवेत एका शेतरस्त्याच्या ठिकाणी गेल्या होत्या. तिथे बोलताना त्या म्हणाल्या, विद्यमान आमदारांनी गेल्या स्वखर्चातून मतदारसंघातील शेतरस्त्यांचे मुरुमीकरण केल्याचा गाजावाजा केला होता. शेतरस्त्यांची कामे केली गेली. याबद्दल आमची कोणतीही हरकत नाही, परंतु हे कामे स्वखर्चातून केले गेलेले नसून, शासकीय निधीतून केले गेलेले आहे. अशी माहिती रोहिणी खडसे यांनी बोलतांना दिली आहे. याप्रसंगी यु.डी. पाटील, भागवत पाटील, भागवत पाटिल ,रामभाऊ पाटिल, मधुकर पाटिल,गणेश पाटिल ,राजेंद्र चौधरी, सोनु पाटिल, भुषण पाटिल, आकाश, पाटिल ,चेतन पाटिल आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular