
लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर
जळ रावेर- यावल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचार सभेसाठी आज फैजपूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते. यावेळी अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे हे एकत्र लढत आहे मात्र राहुल बाबा सावकारांचा विरोध करीत आहे. तरी उद्धव ठाकरे यांच्यात दम असेल तर त्यांनी राहुल गांधी यांच्याकडून सावरकर यांच्या बद्दल दोन शब्द चांगले बोलून दाखवावेत असे खुले आव्हान अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.