Sunday, April 6, 2025
spot_img
29.2 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeताज्या बातम्याखुशखबर ! सोन्याचा भाव पुन्हा घसरला; जाणून घ्या जळगावात आज प्रति तोळ्याचा...

खुशखबर ! सोन्याचा भाव पुन्हा घसरला; जाणून घ्या जळगावात आज प्रति तोळ्याचा भाव किती?

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

ऐन सणासुदीत सोने आणि चांदीच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. मात्र गेल्या आठवड्यापासून दोन्ही धातूंच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. दोन-तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात घट पाहायला मिळत असून अशातच तुलसी विवाहाच्या दिवशी आज सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण झालीये.

लग्नसराईचा काळ येणार असून आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव घसरल्याचं पाहायला मिळतंय. यामुळे लग्नसराईसाठी सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिवाळी दिवशी देशात प्रसिद्ध असलेल्या जळगाव सुवर्णपेठेत सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ८० हजार रुपयावर होता. मात्र दिवाळीनंतर सोने भावात घसरण होत असल्याचं दिसून आले. सोमवारी जळगावात सोने ५०० रुपये प्रति तोळ्याने घसरले. यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७७,७०० रुपये प्रति १० ग्रॅम तर जीएसटी ८० हजार ०३१ रुपये इतकी आहे. दिवाळीनंतर आतापर्यंत सोने दरात २३०० ते २४०० रुपयाची घसरण झालीय.

सध्या चांदीचा दर स्थिर दिसून आला आहे.आज सकाळच्या सत्रात चांदीचा दर ९३००० रुपये प्रति किलो इतकी होती. मात्र गेल्या १० दिवसात चांदी दरात तब्बल ७ हजार रुपयांपेक्षा अधिकची घसरण झाली आहे. दरम्यान दिवाळीनंतर आता लग्नसराईला सुरुवात होत असून या दरम्यान आता दोन्ही धातूंच्या दरात घसरण होते की वाढतात? याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular