
प्रा. विजय लेंडाळ
शेवगाव : सन २०२३/ २४ म्हणजे मागच्या गळीत हंगामात मार्च २०२४ मध्ये ऊस घातलेल्या शेवटच्या पंधरवाड्यातील ज्या शेतकऱ्यांनी संघर्ष योद्धा श्री बबनरावजी ढाकणे केदारेश्वर सह. साखर कारखान्याला ऊस घातला होता आणि ज्यांचे पैसे देणे बाकी होते त्या सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी दिली आहे. या बाबत माहिती देतांना ते म्हणाले की या आगोदर दिवाळी पुर्वी ५० टक्के रक्कम दिली होती. राहिलेले सर्व पैसे आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहेत. आज रोजी ऊस बिलापोटी शेतकऱ्यांचा एक रुपया सुद्धा कारखान्याकडे देणे बाकी नाही. याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. काही अडचण आल्यास कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांच्याशी ८२ ७५ ४३ ८५ ७७ या नंबरवर संपर्क साधावा.