Saturday, April 5, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeराजकीयविकासाच्या वचनासह जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध - गुलाबराव पाटील

विकासाच्या वचनासह जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध – गुलाबराव पाटील

लोकशक्ती न्युज नितीन ठाकूर

जळगाव शिरसोली:- विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे ते जातीपातीचे राजकारण करत आहेत. पण जनता हे ओळखते. मी शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार काम करत आहे. धनुष्यबाण ही आमची आन, बान, शान आहे. जनता विकासाला महत्त्व देते, जाती – पातीच्या सहानुभूतीला जनता भुलणार नसून भागपूर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून परिसराला सुजलाम-सुफलाम करून विकासाच्या वचनासह जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. आगामी वर्षापासून शिरसोलीत भव्य रथोत्सव साजरा करण्याचा संकल्प असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. जनतेने मोठ्या लिडने विजय मिळवून द्यावा,” असे आवाहन महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी केले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. झालेल्या ऐतिहासिक भव्य सभेत अफाट गर्दी आणि कार्यकर्त्यांचा जोष होता.

यावेळी जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, रॉ. का. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, जिल्हा प्रमुख निलेश पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, सुभाष अण्णा पाटील, ज्ञानेश्वर महाजन, देविदास कोळी, मनोज पाटील सर, अनिल भोळे, हर्षल चौधरी, रवि कापडणे, पवन सोनवणे, राजू सोनवणे, अनिल अडकमोल, शिवराज पाटील, मनोहर पाटील, रमेश आप्पा पाटील, शिरसोली प्र.न. आणि शिरसोली प्र. बो. येथिल स्थानिक पदाधिकारी माजी सभापती नंदलाल पाटील, सरपंच हिलाल भील, उपसरपंच द्वारकाबाई बोबडे, बारी पंच मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत आस्वाऱ, अर्जुन पाटील, भागाबाई ताडे, रामकृष्ण काटोले, माजी सरपंच प्रवीण पाटील, प्रवीण बारी, नंदलाल पाटील, नितीन बुंधे, अबु खाटीक, रमजू खाटीक, मुरलीधर ढेंगळे, सुनिल पाटील, विजय काटोले, बबन धनगर, प्रशांत काटोले, शिवदास काळे, नंदलाल वराडे, बाळू वराडे, गोपाल खलसे, जयंत खलसे, गोरख अस्वर, जयराम धनगर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular