Sunday, April 6, 2025
spot_img
29.2 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeताज्या बातम्याजळगाव ते मनमाड आणि भुसावळ ते खंडवा रेल्वे प्रकल्पांना हिरवा कंदील

जळगाव ते मनमाड आणि भुसावळ ते खंडवा रेल्वे प्रकल्पांना हिरवा कंदील

लोकशक्ती न्यूज| नितीन ठाकूर

जळगांव :- नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत महाराष्ट्रातील तीन मल्टी-ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या प्रकल्पांमध्ये मनमाड-जळगाव चाैथ्या रेल्वेलाइनला मंजुरी देताना २,७७३.२६ कोटींची तरतूद केली आहे. याव्यतिरिक्त भुसावळ-खंडवा तिसऱ्या व चौथी लाइन तसेच माणिकपूर-इरादतगंज तिसरी लाइनचा यात समावेश असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वेच्या तीन मोठ्या प्रकल्पांनाही मंजुरी मिळाली. कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी, मंत्रिमंडळाने 3 मल्टीट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, ज्यासाठी एकूण 7927 कोटी रुपये मंजूर केले आहेत. प्रवास सुकर करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल, तेलाची आयात कमी होईल आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनही कमी होईल, ज्यामुळे रेल्वे नेटवर्क अधिक चांगले आणि पर्यावरणपूरक होईल अशी अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular