Sunday, April 6, 2025
spot_img
29.2 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeक्राइमचाळीसगांव तालुक्यातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

चाळीसगांव तालुक्यातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकुर

चाळीसगाव : कुटुंबियांनाजिवे ठार मारण्याची धमकी देत गेल्या दिड महिन्यापासून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार करण्यात आल्याची घटना एका गावात घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.शेतातील झोपडीत अत्याचारचाळीसगाव तालुक्यातील एका गावातील प्रवीण नवनाथ मोरे याने गावातीलच 14 वर्षीय मुलीच्या मनाविरुद्ध तिला मारहाण करून व तिच्या कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने शेतातील झोपडीत शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

त्रास असह्य झाल्यानंतर पिडीत मुलीने कुटुंबियांना सर्व आपबिती सांगितली. त्यानंतर पिडीतेच्या पालकांनी तत्काळ चाळीसगाव पोलिसात धाव घेत आपली तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ पोस्को अंतर्गत गुन्हा केला असून पुढील तपास पीएसआय प्रदीप शेवाळे हे करीत आहेत. संशयित आरोपीचा शोध सुरू असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular