
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
जळगावः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, पक्षातील वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांच्याविरोधात अर्वाच्य व गलिच्छ भाषेचा वापर करणाऱ्या गुलाबराव देवकर आणि त्यांच्या समर्थकांना पक्ष प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे
अजितदादा पवार व त्यांच्या समर्थकांवर गलिच्छ टीका केल्यामुळे पक्षाच्या शिस्तीचे पालन करत हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या अपमानास सहन केले जाणार नाही. कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आली असून, पक्षाच्या एकता व सन्मानासाठी शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुलाबराव देवकर यांनी पक्षातील नेत्यांवर टीका करत अजितदादा पवार व त्यांच्या समर्थकांना अपमानित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पक्षाच्या शिस्तीचे पालन व नेत्यांचा सन्मान राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. पक्षाच्या जळगाव जिल्हा शाखेने सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना याबाबत सूचित केले असून, पक्षाची शिस्त व एकता कायम राखण्याचे आवाहन केले आहे.
मा.अजित दादा पवार यांच्यावर गलिच्छ व अर्वाचन भाषेचा वापर करून त्यांच्याच व त्यांच्या समर्थकांना पक्षात प्रवेश मागणाऱ्या गुलाबराव देवकरांना व त्यांचा समर्थकांना राष्ट्रवादी पक्ष अजितदादा गटात पक्ष प्रवेश बंदी बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव ग्रामीण च्या पदाधिकाऱ्यांनी आज जळगाव येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित मान्यवर ज्ञानेश्वर महाजन ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष,रमेश बापू पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख,नाटेश्वर पवार युवक जिल्हा कार्याध्यक्ष, शामकांत पाटील धरणगाव तालुकाध्यक्ष,अरविंद मानकरी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष,शोभाताई पाटील महिला तालुकाध्यक्ष,ईश्वर लाला सर किसान सेल जिल्हाध्यक्ष, कैलास चव्हाण जिल्हा सरचिटणीस,रवींद्र नानाजी पवार तालुका कार्याध्यक्ष ,भूषण पवार जळगाव तालुकाध्यक्ष,आदी मान्यवर व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते