Saturday, April 5, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
HomeblogCBI चे पथक जळगावात दाखल, वाचा काय आहे कारण ?

CBI चे पथक जळगावात दाखल, वाचा काय आहे कारण ?

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

जळगाव : माजी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित चाळीसगाव आणि जळगाव पोलीस ठाण्यात दाखल गून्ह्यांशी संबंधित चौकशीसाठी सीबीआयचे दोन अधिकाऱ्यांचे पथक आज जळगावत धडकले. हे पथक साधारण एक आठवडाभर जळगावात थांबणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध बीएचआर प्रकरणात सुनील झवर यांना जामीन मिळवून देण्यासाठी कोट्यवधी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. तसेच जळगाव शहर पोलीस ठाण्यात कट रचून खोट्या गुन्ह्यात निलेश भोईटेसह इतरांना अटकवण्याचे षडयंत्र रचल्याचाही गुन्हा दाखल आहे. या दोघ गुन्ह्यांशी संबंधित चौकशीसाठी आज सीबीआयचे पथक जळगावात धडकले होते.

सीबीआयच्या पथकामध्ये पथकामध्ये अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह अन्य एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. तसेच या पथकाने दोघं गुन्ह्यांशी संबंधित व्यक्तींना चौकशीसह जाब-जबाबसाठी बोलविले असल्याचेही कळते. आज काही जणांची चौकशी केल्याची माहिती देखिल सूत्रांनी दिली आहे. हे पथक आठवडाभर थांबणार असल्याचेही माहितीही सूत्रांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular