Saturday, April 5, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeक्राइमजळगाव भीषण अपघात; पायी जाणाऱ्याला आयशरने उडवले!

जळगाव भीषण अपघात; पायी जाणाऱ्याला आयशरने उडवले!

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

जळगाव :-अजिंठा चौकात रात्री भरधाव ट्रकने एकाला चिरडल्याची घटना ताजी असताना अवघ्या १२ तासात दुसऱ्या घटनेत भरधाव आयशरने कृषी समितीजवळ एका पायी जाणाऱ्या तरुणाला उडवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान बेशिस्त वाहतुकीमुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. अजय सिताराम कोळी वय २६ रा. पिंपळे खुर्द ता. धरणगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अजिंठा चौकात बुधवारी १८ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्य सुमारास एका भरदार ट्रकने चिरल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना गुरुवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भुसावळकडून जळगावकडे जाणारा एका भरधाव आयशरने पायी जाणाऱ्या अजय कोळी याला जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. दरम्यान मयताच्या खिशातील कागदपत्रामुळे त्यांची ओळख पटली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular