Saturday, April 5, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeक्राइमलक्झरी बसच्या अपघातात महिला प्रवासी जागीच ठार

लक्झरी बसच्या अपघातात महिला प्रवासी जागीच ठार

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकुर

जळगाव :  गुजरात राज्यातून अकोला येथील मलकापूर मार्गे प्रवास करत असलेल्या लक्झरी बसचा धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ झालेल्या अपघातात एक प्रवाशी महिला मृत्यूमुखी पडली, तर इतर ८ ते १० प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी, २४ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता घडला.

सुरत येथून निघालेली लक्झरी बस (क्रमांक जीजे ०१ डीवाय ५५०२) एरंडोल मार्गे मलकापूरकडे जात असताना धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ साड्यांचे गाठोडे एका बाजूला झाल्याने चालकाने लक्झरी बसवरील नियंत्रण गमविले  आणि लक्झरीबस डिव्हायडर ओलांडून पलीकडे जाऊन पलटी झाली.या अपघातात कविता सिद्धार्थ नरवाडे (वय ३०) या प्रवाशी महिलेचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात कविता सिद्धार्थ नरवाडे (वय-३०, रा. भीम नगर, उधना, गुजरात) या प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर विठ्ठल अमृत कोगदे (वय-७५, रा.पळशी ता. बाळापूर जि. अकोला), सोपान नारायण सपकाळ (वय-५४, रा. नरवेल ता. मलकापूर), प्रशांत गजानन धांडे (वय-३३, रा.नरवेल ता. मलकापूर)  विश्वनाथ नामदेव वाघमारे (वय-६५ रा.वरणगाव) यांच्यासह इतर ८ ते १० प्रवासी हे जखमी झाले आहे.

कविता नरवाडे आपल्या पतीच्या उपचारासाठी नांदुरा येथील भावाकडे जात होत्या, त्यांच्याशी संबंधित कुटुंबातील इतर सदस्यांसह. अपघातामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती सिद्धार्थ नरवाडे, मुलगा राज,णि दोन मुली खुशी आणि तनु असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

जखमी प्रवाशांना तात्काळ स्थानिक नागरिकांनी मदत करून जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular