Sunday, April 6, 2025
spot_img
29.2 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeशेत - शिवारजिल्ह्यात आज, उद्या पावसाचा यलो अलर्ट

जिल्ह्यात आज, उद्या पावसाचा यलो अलर्ट

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

जळगाव : भारतीय हवामानखाते, प्रादेशिक हवामान केंद्र (कुलाबा, मुंबई) यांच्यातर्फे देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी (२७ डिसेंबर) व शनिवारी (२८ डिसेंबर) यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात २० मिलिमीटर पावसाची शक्यता लक्षात घेता कापूस उत्पादकांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.हवामान अंदाजाच्या अनुषंगाने जिल्ह्यात शुक्रवारी, (२७ डिसेंबर) विजांच्या कडकडाटासह वादळ, ३०-४० किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर शनिवारी (२८ डिसेंबर) विजांच्या कडकडाटांसह वादळीवारा आणि गारपिटीसह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून कृतिशील उपाययोजना कराव्यात.कापूस वेचणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी सुरक्षितस्थळी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका यांना गटारी स्वच्छ करण्याबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.हवामानाबाबत अधिकृत माहिती घ्यावी, आपत्तीत मदतीची गरज भासल्यास जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात टोल फ्री १०७७ किंवा ०२५७-२२१७१९३ किंवा ०२५७- २२२३१८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular