
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
जळगाव : येथील शारदा एज्युकेशन फाउंडेशन व श्री संत जगनाडे महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे रविवारी दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी तेली समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात ७ विवाह जुळले असून १ आदर्श विवाह या ठिकाणी पार पडला. तसेच मेळाव्यात १४०० हून अधिक विवाहेच्छुक वधू – वर यांनी नोंदणी करून परिचय करून दिला.
शांताराम नारायण चौधरी नगर, खान्देश सेंट्रल मॉल परिसरात आयोजित मेळाव्यामध्ये हजारोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी तेली समाजातील वधू-वर तसेच पालकांनी आपल्या पाल्यांच्या परिचय करून दिला. परिचय करून देणाऱ्या वधुना आयोजकांच्या वतीने श्री संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
यांची होती उपस्थितीव्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आ. राजूमामा तथा सुरेश भोळे यांच्यासह उद्योजक नंदू चौधरी, विनोद चौधरी, विजय चौधरी, धरणगावचे माजी नगराध्यक्ष संतोष चौधरी, सुरेश चौधरी, रामचंद्र चौधरी, निर्मला चौधरी, बबन चौधरी, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, दिंगबर चौधरी, शिवलाल चौधरी, माजी नगरसेवक दिंगबर चौधरी, ऍड. महेंद्र चौधरी, भास्कर चौधरी, मणिलाल चौधरी यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले पदाधिकारी उपस्थित होते.
असे आदर्श विवाह अन्य समाजातही व्हावे : मंत्री गुलाबराव
पाटीलसमाजात पैसे खर्च करून मोठा विवाह करण्याची एक प्रथा पडली आहे. या प्रथेला तडा देत या नव वर-वधुनी समाजात एक नवीन ओळख निर्माण केली आहे. असा आदर्श विवाह इतर समाजातही व्हावे, असे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तसेच त्यांनी नव वर-वधु यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.