Saturday, April 5, 2025
spot_img
35.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeक्राइमगावठी पिस्तूल व तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या मामा भाच्याला पाठलाग करून अटक

गावठी पिस्तूल व तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या मामा भाच्याला पाठलाग करून अटक

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

जळगाव: शहरात मागील वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी दहशत माजविणाऱ्या मामा-भांजाला शनिपेठ पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली आहे. हे मामा-भाचे आसोदा रोडवरील मोहन टॉकीज जवळ रात्री अडीच वाजेच्या सुमारास देशी कट्टा तसेच हातात धारदार तलवार घेऊन भीतीदायक वातावरण निर्माण करत होते.

सविस्तर वृत्त असे की, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात गुन्हे घडू नये याची पोलिसांकडून खबरदारी घेतली जात होती. यानुसार पोलीस शहरात नाकाबंदी व सक्त पेट्रोलिंग करत होते. अशाच प्रकारे पेट्रोलिंग दरम्यान शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना गुप्त माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीवरून असोदा रोडवरील मोहन टॉकीज जवळ दोन जण हातात शस्त्र घेऊन दहशत माजवीत आहेत, त्यांनी लागलीच पथक तयार करून दोघ साथीदारांना शस्त्रांसह ताब्यात घेतले.

यात शाम साहेबराव सपकाळे (वय-३०) आणि त्याचा भाचा विशाल उर्फ सोनु धनराज सोनवणे (वय २०) (दोघंही रा. आसोदा रोड, मोहन टॉकीजजवळ, जळगाव) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. शाम सपकाळे याच्याकडून जीवंत काडतूसांसह गावठी पिस्तुल जप्त केल्यानंतर त्याचा भाचा विशाल उर्फ सोनू सोनवणे याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली. त्या दोघ मामा भाच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular