
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
पाळधी (ता. धरणगाव) :भरधाव धावणारी बस कारला धडकून रस्त्याच्या खाली उतरली, यात कोणीही जखमी झाले नाही.बी .अमळनेर येथील रहिवासी रणजित शिंदे हे त्यांचे कुटुंबासह गोवा येथे जात होते. त्यासाठी ते आपल्या कार (क्र. एमएच १९ सीवाय ४८५२) ने जळगावी येत होते. या वेळी कारमध्ये कुटुंबसह भाचा वरद देवकर (रा. जळगाव) सुद्धा होता.
सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांनी महामार्गावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी पारस पेट्रोल पंपावर वळविली. तेव्हा चोरगावहून जळगावी जाणारी बस (क्र. एमएच १४ बीटी २३६३) ने समोरील बोनटला जोरदार धडक दिली. धडक देऊन बस रस्त्याच्या खाली उतरली. यात ती अर्धी खाली तर अर्धी वर अशा अवस्थेत लटकलेली होती. यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले.या वेळी वाहतूक विस्कळीत झाली होती. ती पाळधी पोलिसांनी सुरळित केली. याबाबत वरद गिरीश देवकर रा. जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाळधी पोलीस करीत आहेत.