Saturday, April 5, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeमनोरंजनखेळ भावना विद्यार्थ्यांसाठी जीवनाची पाठशाळा: मंत्री गुलाबराव पाटील

खेळ भावना विद्यार्थ्यांसाठी जीवनाची पाठशाळा: मंत्री गुलाबराव पाटील

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

जळगाव:- सॉफ्टबॉलसारख्या स्पर्धा शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि मानसिक समतोल वाढवण्यास मदत करतात. खेळ विद्यार्थ्यांना सामूहिकतेची भावना आणि अनुशासनाचे महत्त्व पटवून देतात. खेळ भावना विद्यार्थ्यांसाठी जीवनाची पाठशाळा आहे. ती विद्यार्थ्यांना मेहनत, एकता, सहयोग आणि परस्पर आदर शिकवते, जे जीवनात यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेच्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत व खेळाडूंना शुभेच्छा देत, आपल्या क्रीडाशक्तीला प्रकट करा आणि सकारात्मक बदल घडवा, मैत्रीपूर्ण स्पर्धेची भावना कायम ठेवा आणि आपल्या म हनतीद्वारे समाज आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या, असे आवाहन केले.

या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल त्यांनी कौतुक केले. या स्पर्धेमुळे जळगावला राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळत आहे. क्रीडा हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून तो राष्ट्रीय आणि सामाजिक बांधिलकीचा बोध देतो, असेही ते म्हणाले. या स्पर्धेत २१ राज्यांतील ७०० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. प्रमुख अतिथी म्हणून आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ. सुरेश भोळे, पंजाबचे आ. विनरजित सिंग, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त नारायण खडके, श्याम कोगटा, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त तथा सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, माजी नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, सॉफ्टबॉल महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पी. ई. पाटील, स्पर्धा निरीक्षक प‌द्मसिंग कौंतेय यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी आकाशात फुगे सोडून राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन केले. मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी क्रीडांगणाचे पूजन करून स्वतः सॉफ्टबॉल खेळून खेळाडूंना प्रोत्साहित केले. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले. आभार सचिन निकम क्रीडा अधिकारी यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular