
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
जळगाव:- संकटाला न घाबरता सक्षमपणे सामोरे जाण्याची जिद्द बाळगा. ‘गरजू आणि अनाथ व्यक्तींना आधार देणे म्हणजे त्यांच्या आयुष्यात नवी ऊर्जा निर्माण करणे होय. सेवाधर्म ही आपल्या संस्कृतीची ओळख असून, अशा कार्यातून समाजाला प्रेरणा मिळते. सामाजिक बांधिलकीतून पुढे येणाऱ्या अशा उपक्रमांनी समाजाला नवीन दिशा मिळते, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.सेवाधर्म परिवार व संस्रोत ग्रीन टेक्नॉलॉजीचे संचालक जितेश राजपूत यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आयजी दत्तात्रय कराळे होते.याप्रसंगी आयजी दत्तात्रय कराळे यांनी बोलताना सांगितले, ‘समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सामूहिक प्रयत्नांतूनच आपल्याला समाजाचा विकास साधता येईल.स्वतःच्या पायावर उभे राहण्याचीही जिद्द ठेवावी. शिधासोबत ऊर्जा, विचार व अनुभव सोबत घेऊन जा. अशा उपक्रमांमुळे गरजूंना दिलासा मिळतो.
किराणा कीट वितरण
या कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त गरजू आणि अनाथांना किराणाचे कीट मंत्री गुलाबराव पाटील आणि आयजी दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक चंद्रशेखर नेवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जितेश राजपूत यांनी मानले. या वेळी डॉ. नेहा भंगाळे, डॉ. धर्मेंद्र पाटील, भारती कुमावत, चंद्रशेखर कापडे, डॉ. नीलिमा सेठानी, योगिता बावस्कर, अरुणा नेवे, नितीन महाजन, वंदना पवार, कोमल पाटील, सपना राजपूत, मुकुंदराव नन्नवरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी अनिल पाटील, दुर्गादास पाटील, नितीन महाजन, विक्रम कापडणे यांच्यासह सेवाधर्म परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.