Saturday, April 5, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeमनोरंजनखेळ हा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर तो शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी...

खेळ हा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर तो शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी आवश्यक – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी / दिनांक 11 जानेवारी – “खेळ हा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर तो शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे. तो आपल्याला शिस्त, संघभावना, आणि कठीण परिस्थितीत यश मिळवण्याची प्रेरणा देतो, क्रिकेटच्या माध्यमातून संयम, मेहनत आणि संघभावना शिकायला मिळते. त्यांनी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचे विचार उद्धृत करताना सांगितले, “हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा… हे गीत म्हणून जिथे प्रत्येक चेंडू ही संधी असते, आणि त्या संधीचा पुरेपूर उपयोग करणे हेच आपले ध्येय असायला हवे.

खेळामध्ये विजय आणि पराजय हे क्षणिक असतात, पण प्रयत्न आणि प्रामाणिकपणा नेहमीच महत्त्वाचे ठरतात. ही स्पर्धा एकमेकांशी जोडणारी, मैत्री आणि परस्पर आदर वाढवणारी आहे,” असे सांगून त्यांनी खेळाडूंना विजयाच्या पलीकडे जाऊन खेळाडूवृत्ती जपण्याचे आवाहन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते .कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच “खेल सिर्फ जीत का नाम नहीं, यह तो सीखने और सिखाने का काम है।  या शेरो – शायरीने सुरुवात केली. तर शेवटी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व खेळाडूंना हसतमुखाने खेळण्याचा सल्ला दिला आणि म्हणाले, “खेळाला जो आपला आत्मा मानतो, तोच खरा विजेता ठरतो असे ही मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमाला खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, सा.प्र.वी.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे, प्राथमिकचे शिक्षणधिकारी विकास पाटील, माध्यमिकचे शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण, समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग , पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे, सिंचनचे अमोल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर , गट विकास अधिकारी मजुश्री गायकवाड, यांचेसह जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .जळगाव जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी आयोजित क्रिकेट सह विविध खेळांच्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील , खासदार स्मिता वाघ,आमदार राजू मामा भोळे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

शनिवार दि.११ रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या पुरुष क्रिकेट , महिला क्रिकेट , बॅट मिंटन, रस्सी खेच , बुद्धिबळ, कॅरम आदी स्पर्धा घेण्यात आल्या. शनिवारी घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील शिल्लक स्पर्धा रविवार दि.१२ रोजी घेण्यात येणार आहेत. त्या सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण देखील रविवारी घेण्यात येणार आहे .कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, आणि नागरिक तसेच पंचायत समिती स्तरावरील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular