Saturday, April 5, 2025
spot_img
37.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeराजकीयशिवसेना शिंदे गटाच्या, जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे नियुक्त !

शिवसेना शिंदे गटाच्या, जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे नियुक्त !

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

जळगाव :- विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच – राजकीय पक्षांकडून संघटनात्मक बांधणीला महत्त्व दिले जाते आहे. शिवसेनेच्या ठाकरे गट पाठोपाठ शिंदे गटातनेही भाकरी फिरवली आहे. जिल्हाप्रमुखपदी दोन महिन्यापूर्वीच पक्षात आलेले – विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली.तसे पत्र मंगळवारी त्यांना मुंबईत देण्यात आले.

मावळते जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांच्यावर सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक आटोपताच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. संघटन मजबूत असेल तर तळागाळापर्यंत पक्षाची कामे पोहोचवणे शक्य असते. त्यामुळे राज्यभरात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे संकेत अलिकडे मिळाले होते.त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही पक्षांतर्गत बदलाचे वारे जोरात सुरू झाले होते.

जळगाव जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांच्यावर सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे तर नीलेश पाटील यांच्या जागेवर ठाकरे गटात जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळलेले विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भंगाळे यांना मंगळवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते मुंबईत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. मात्र, नीलेश पाटील यांना सहसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याचे पत्र अद्याप देण्यात आलेले नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular