
कांबी प्रतिनिधी अमोल म्हस्के.
दि. ०२, शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील मास्टर स्ट्रोक क्लासेस च्या इ .१० वी मार्च २०२४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कल्याणराव पोटभरे होते .कार्यक्रमांची सुरुवात अध्यक्षाच्या हस्ते प्रतिमा पुजनाने झाली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लासचे संचालक राजेंद्र जाधव यांनी केले. क्लासेस ची सुरुवात कशी झाली, किती कठीण प्रसंग आले सगळी व्यथा मास्टर स्ट्रोक क्लासेस चे संचालक श्री अमोल केसभट यांनी मांडली व विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत सात वर्षाची परंपरा कायम राखली असे मनोगत व्यक्त करताना सांगितले.१) श्रेया विठ्ठल मार्कंडे – ९२.६० ( प्रथम) २) समृद्धी दिपक गायकवाड – ९१.६०(द्वितीय) ३)ऋषिकेश विशाल बावणे- ९१.६० (तृतीय) ४) श्रुती राजाराम पोटभरे -९०.६० (चौथा) क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या गुणगौरव सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून के.बी. शेख सर , पोटभरे सर, जाधव सर उपस्थित होते. यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रवींद्र बोरुडे यांनी केले व आभार श्री खेडकर सर यांनी व्यक्त केले.