
कांबी प्रतिनिधी अमोल म्हस्के
शेवगाव तालुक्यातील कांबी हायस्कुलने ०१ जून रोजी शाळेत नव्याने प्रविष्ट होणारे व नियमित विद्यार्थ्यांचे वाद्यांच्या गजरात वाजतगाजत गावामधून मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारावर गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन सर्व नवागतांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
प्रतिमपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप दत्ता महाराज बोरकर होते. मुलांनी शिक्षकांचा आदर करावा, नियमित अभ्यास करावा, खूप यशस्वी व्हावे, शाळेच्या उपकाराची परतफेड करावी असे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी इ १० वी गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट दर्जाची फाईल व गुलाबपुष्प देऊन गुणगौरव केला. सरपंच नितीशजी पारनेरे, उपसरपंच सुनिलभैया राजपूत यांनीही मुलांना शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर पवार सरांनी सर्वांचे स्वागत करत गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळा व संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांनी शाळा व संस्थेच्या शाळा ०१ जूनला शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत व अभिनंदन केले. यावेळी केदारेश्वर कारखान्याचे संचालक सुरेशतात्या होळकर, कृषी अधिकारी पवार साहेब, भागवत कु-हे, रामजी पा पवार, बाबानाना म्हस्के, नंदुभाऊ कु-हे, रासपाचे बाजीराव पा लेंडाळ, ग्रामपंचायत सदस्य आसाराम पा कर्डीले, संजय भेरे, इसाक भाई शेख, बाबासाहेब दसपुते, निर्मलसिंग राजपूत, संभाजी खरड, हरिश्चंद्र राजपूत, राम शिंदे , एकनाथ जवरे, स्वाती वाहूरवाघ, अनिल ढवळे, वैभव सुपेकर, रावसाहेब पवार, बाळासाहेब डेंगळे व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी व आभार नंदू खाडे यांनी मानले.