
सुखदेव गायकवाड शेवगाव प्रतिनिधी
भाजपा नेत्या पंकजा मुंडे व ना.धनंजय मुंडे यांच्या विरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे बोधेगाव पोलीस दुरक्षेत्रास निवेदन देवून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.भाजपा नेत्या पंकजा मुंडे व ना.धनंजय मुंडे यांच्या विरुध्द सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करून समाजा समाजात जातीय तेढ निर्माण होईल.असे गैर कृत्य काही समाजकंटकांनी केले आहे.त्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी ९ वाजता मुंडे समर्थकांनी बोधेगाव येथे गोपीनाथ मुंडे चौकात एकत्रित येवून संबंधित घटनेचा जाहीर निषेध करून संबंधित समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करून कडक शासन करावे.अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.मागण्याचे निवेदन पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर गर्जे यांना देण्यात आले.यावेळी दिलीप खेडकर, महादेव दराडे, माजी सरपंच राम अंधारे, माणिक गर्जे, प्रकाश गर्जे, भीमा बनसोडे, लाडजळगावचे सरपंच अंबादास ढाकणे, ठाकूर पिंपळगावचे सरपंच संजय खेडकर, वंचितच्या तालुकाध्यक्ष संगीता ढवळे, भागवत भोसले, आदिनाथ मासाळकर, केशव खेडकर, अजिनाथ गर्जे, बाबा गिरी, भागवत शिंगाडे यांचेसह बोधेगाव परिसरातील मुंडे समर्थक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.