
तेजस ढाकणे
तालुका प्रतिनिधी
शेवगाव : गेल्या पंचवीस वर्षापासून जनतेच्या हितासाठी, सेवेसाठी जनशक्ती विकास आघाडी नेहमीच कटिबद्ध राहीली आहे. छोट्या मोठ्या विषयावर सर्वसामान्यांना न्याय मिळावा तालुक्यातील मतदार संघातील प्रश्न सुटावेत यासाठी आमची टीम सातत्याने कार्यरत असते. जनशक्तीचे हे कार्यालय शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील जनतेची उत्तमपणे सेवा करेल त्यांना न्याय देण्यासाठी जमेल तेवढे प्रयत्न आम्ही करणार असल्याचे प्रतिपादन जनशक्तीच्या नेत्या जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे यांनी शेवगाव येथे केले.
गुरुवार दि.(१३) रोजी शेवगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात जनशक्ती विकास आघाडी व जनशक्ती फाउंडेशनचे नूतन जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ ताजनापूर येथील दत्त आश्रमाचे ह.भ.प. बालयोगी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक ॲड.शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, पृथ्वीसिंह काकडे, कॉ.राम पोटफोडे, अर्जुन झिरपे, विक्रम ढाकणे, अशोक ढाकणे, वजीर पठाण, अकबर शेख, शंकर काटे, भारत लांडे, अल्ताफ शेख, भागवत रासनकर, माणिक गर्जे, भागवत भोसले, राधाकिसन शिंदे, हरिभाऊ फाटे, राम भालेराव, किसन झुंबड, अर्जुन खंडागळे, बबन झिरपे, विक्रम झिरपे, रामकिसन सांगळे, जालिंदर कापसे, पंडित नेमाने, अशोक पातकळ, गणेश उगले, राजेंद्र पातकळ, अशोक दातीर, मोतीराम काळे, भिवसेन केदार, देविदास गिर्हे, बाळासाहेब पाटेकर, विनोद पवार, अण्णासाहेब काळे, बाबासाहेब चौधरी, महेंद्र मेरड, बाबासाहेब दळे, भाऊसाहेब बोडखे, भगवान डावरे, आदिनाथ कापरे लक्ष्मण गवळी, भीमराज शिंदे, लक्ष्मण मगर, बंडू रासने, नवनाथ कवडे, अजय भारस्कर, विनोद फलके, शेषराव फलके, सुरेश लोखंडे, सुरेश चौधरी, राजेंद्र पोटपोडे, आबासाहेब काकडे, प्रकाश मगर, किशोर दहिफळे, प्रल्हाद पुंडे, शंकर काकडे, बाळासाहेब काकडे, गोरक्ष वावरे, सुनील काकडे, सचिन आधाट, अशोक आव्हाड, बाळासाहेब आव्हाड, भागचंद कुंडकर, मनोज घोंगडे, भाऊसाहेब राजळे, रमेश ढाकणे, दादासाहेब सातपुते, नामदेव जायभाये, महादेव जवरे, आदिनाथ धावणे, बाबासाहेब धावणे, रामजी मडके, विठ्ठल मडके, सुभाष आंधळे, रामभाऊ काळे, शेषराव बटुळे, रवींद्र कराड आधी यावेळी प्रमुख उपस्थितीत होते.
पुढे बोलतांना सौ.काकडे म्हणाल्या की, जनशक्तीच्या इच्छाशक्ती व कार्यशक्तीच्या बळावर साडेचारशे कोटींचा ताजनापूरचा प्रकल्प देखील जनशक्तीने खेचून आणला. असे असंख्य प्रकारचे जिल्ह्यातील तालुक्यातील कोणत्याही राजकीय नेत्याला न समजलेले जनतेचे प्रश्न जनशक्तीच्या कार्यकर्त्यांना समजलेत व त्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याची आमची इच्छा आहे. हे सामाजिक कार्य ईश्वराच्या साक्षीने आम्ही जनतेला समर्पित करीत आहोत.
अॅड.शिवाजी काकडे म्हणाले की, तालुक्यातील जनतेला आता बदल पाहिजे आहे. नव्या नेतृत्वाची पहाट आज उगवलेली आहे. ज्या घराण्यांना, कुटुंबांना या मतदारसंघातील जनतेने वारंवार नेतृत्व करण्याची संधी दिली आणि वारंवार संधी देऊ नये देखील जनतेच्या पदरात काहीच पडलेले नाही. त्यामुळे या मतदारसंघातील जनतेला बदल हवा आहे. तो बदल हर्षदा काकडे यांच्या रूपाने नक्कीच जनतेची स्वीकारण्याची मनस्थिती झालेली आहे आणि त्यासाठी हे कार्यालय समर्पितपणे काम करणार असल्याचेही ते म्हणाले.
चौकट – शेवगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालयाचा शुभारंभ होतोय याचा आनंद आहे. या सुंदरशा कार्यालयामुळे सर्वसामान्य जनतेला जनशक्तीशी संपर्क साधताना आता सह शक्य होणार आहे. जगन्नाथ गावडे., महासचिव जनशक्ती विकास आघाडी शेवगाव-पाथर्डी.