Saturday, April 5, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeblogसिद्धार्थ किसन चव्हाण यांची वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात पेटंट ऑफिसर म्हणून निवड

सिद्धार्थ किसन चव्हाण यांची वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात पेटंट ऑफिसर म्हणून निवड

शेवगाव (प्रतिनिधी :सुखदेव गायकवाड)


भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालला अंतर्गत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय स्पर्धा परीक्षामध्ये शेवगाव येथील सिद्धार्थ किसन चव्हाण यांची वाणिज्य व उद्योग मंत्रालयामध्ये पेटंट ऑफिसर (क्लास 1 राजपात्रित अधिकारी )म्हणून निवड झाली आहे. देश स्तरावर पूर्वपरीक्षा मुख्यपरीक्षा आणि नंतर तोंडी मुलाखत होऊन अंतिम निवड झाली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये ही नगरपालिका संगणक अभियंता अ श्रेणी पदी ही मागच्या आठवड्यात निवड झालेली आहे.

सिद्धार्थ किसन चव्हाण यांचे शालेय शिक्षण शेवगाव येथील रेसिडेन्सीयल हायस्कुल मध्ये झाले असून पुढील शिक्षण पुणे येथील सी ओ इ पी अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉम्पुटर इंजिनियर झाले आहे.

सिद्धार्थ चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांचे चिरंजीव आहे किसन चव्हाण हे श्री संत वामनभाऊ विद्यालय वडूले खुर्द येथे गेल्या वीस वर्षांपासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून आई सुनीता चव्हाण याही माध्यमिक शिक्षिका आहेत या निवडीमुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular