
शेवगाव (प्रतिनिधी) : पशुवैद्यकीय सेवा थेट शेतकऱ्याच्या दारी पोहोचवण्यासाठी व राज्यातील तीन कोटी पशुधन जपण्यासाठी जीपीएस प्रणालीयुक्त फिरते पशुवैद्यकीय पथक महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने कार्यान्वित केलेले असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे होत असून शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील शेतकरी संभाजीराजे गरड यांच्या शेतात म्हैस आजारी असल्यामुळे त्यांनी १९६२ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क केला असता पशुसंवर्धन विभागाचा फिरता दवाखाना थेट यांच्या शेतामध्ये हजर झाला. शेतकऱ्यांना त्यांचे पशुधन आजारी पडल्यावर ४ ते ५ किमी अंतरावर असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे लागत असे. एवढे करूनही पशुवैद्यकीय अधिकारी दवाखान्यात नसल्याने शेतकऱ्यांची हेळसांड व्हायची परंतु पशुसंवर्धन विभागाचा फिरता दवाखाना या योजनेमुळे पशुपालकांना त्रास होणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. पशुपालकांनी आपले पशुधन वाचवण्यासाठी १९६२ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधून या सेवेचा लाभ घ्यावा. यावेळी उपचार करण्यासाठी पंचायत समिती शेवगावचे पशुधन विकासअधिकारी अनिकेत आरोळे, चालक तुषार ठोंबळ, पशुपालक संभाजीराजे गरड, शंतनू गरड, रमेश बावणे, कचरू काळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.