जनतेमध्ये भीतीचे वातावरण, प्रशासनाने व संबंधित विभागाने लक्ष घालून जनतेच्या मनातील भीती दूर करावी.

शेवगाव : दि. २८, रात्री आठ नंतर ड्रोन सदृष उपकरण पाहिले असल्याची माहिती शेवगाव तालुक्यातील कांबी येथील लेंडाळ वस्तीवरील काही शेतकऱ्यांनी सांगितले. याबाबत माहिती देताना सांगितले की बुधवार दि. २६ रोजी रात्री आठ वाजता ड्रोन सदृष उपकरणे आकाशात घिरट्या घालताना दिसले.
हे उपकरणे कांबी शेजारील गावातून येत असून यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघांचे अहमदनगर जिल्हाउपाध्यक्ष तथा लोकशक्ती न्यूज२४ चे संपादक प्रा. विजय लेंडाळ हे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. घराच्या काही अंतरावर घिरट्या घेत असल्याने ग्रामस्थांसह नागरिक चिंतेत आहेत. हे ड्रोन काही सर्वे करतात की चोरटे ड्रोनद्वारे टेहाळणी करून चोरी करीत आहेत हे समजायला तयार नाही. सध्या या ड्रोनची चर्चा गावांमध्ये व सोशल मीडियावर रंगली आहे.
याबाबत लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून शासकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ काळजी घेऊन जनतेच्या मनातील भिती नाहीशी होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जनतेतून करण्यात आले आहे.