
कांबी प्रतिनिधी अमोल म्हस्के
शेवगाव : वृक्षारोपण काळाची गरज आहे आज झाड लावले तर भविष्यात तेच झाड आपल्याला फळ ,फुल ,सावली देईल .वातावरणात गारवा निर्माण करेल,पावसाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल .हवा शुद्ध होऊन ऑक्सिजनचे प्रमाण टिकून राहील म्हणून आपण मोठ्या संख्येने झाडे लावायला हवीत आणि त्याचे संवर्धन करून वाढविले पाहिजे असे अहवान वसतिगृह अधीक्षिका अकोलकर यांनी केले .पर्यावरणाचा ढासळणारा समतोल , जागतिक तापमानात होणारी वाढ रोखण्यासाठी फक्त कथनी नव्हे तर प्रत्यक्ष कृती करत चापडगाव येथील श्री संत गाडगे महाराज कन्या छात्रालयात कृषी दिन तसेच हरितक्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले .वसतिगृह परिसरात दोन पेरूची झाडे लावण्यात आली .