Sunday, April 6, 2025
spot_img
29.2 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeताज्या बातम्यावाशिम येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

वाशिम येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

वाशिम प्रतिनिधि राम इढोळे

वाशिम येथील महत्त्वाचा मार्ग असलेल्या अकोला नाका छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशिम येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने आज दि.1 जुलै 2024 रोज सोमवारला सकाळी 11:30 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.8,9,10 एप्रिलच् 2024 या उन्हाळी नुकसानीचे शेतकऱ्यांना मोबदलाा देण्यात यावा, शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करण्यात यावे, भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीनला भाव देण्यात यावा, स्प्रिंकलचे सबसिडीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ जमाा करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना कर्ज देण्यास खाजगी शासकीय व राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असून दिरंगाई व टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रिसोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, युवक राज्य उपाध्यक्ष केशव गरकळ,पप्पू हेंद्रे,विनोद घुगे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने शासना विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष सुर्वे,जिल्हाध्यक्ष युवक जिल्हा अध्यक्ष सचिन काकडे,देव इंगोले, गजानन काकडे,उद्धवराव इडोळेे,जगन्नाथ अवचार,शिवाजी कडणे,प्रदुम अवचार रवींद्र चोपडे विकास झुंगरे जालिंदर देवकर,गजानन जाधव, रवी जाधव श्रीरंग नागरे, बबलू खरात,पप्पू हेंद्रे यांच्यासह भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.रास्ता रोको आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाशीम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव,गुप्तचर यंत्रणेचे देवकते यांच्यासह पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.रास्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान या मार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular