
गायकवाड जळगाव प्रतिनिधी शेख शौकत
गेवराई तालुक्यातील चकलांबा या गावातील शेतकरी मोलमजुरी करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देवुन नोकरी लागेपर्यंत मुलांना शिकवतात.असेच या गावातील रहिवासी युनुस सय्यद यांनी आपल्या मुलाला डॉ.सोहेल युनुस सय्यद याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद माध्यामिक शाळा चकलांबा येथे इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण मुळ गावी पुर्ण झाले.माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नीट युजी साठी लातुर येथील शाहू कॉलेजमध्ये शिक्षण पुर्ण केले.नंतर उत्तीर्ण झाल्यावर नीट सन २०१७ मध्ये महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सेवाग्राम ,वर्धा (सेंट्रल गव्हर्मेंट कॉलेज) येथून सन २०२२ ला MBBS शिक्षण पुर्ण केले. नंतर २०२२-२०२३ ला इंटरशीप एक वर्ष पूर्ण होऊन,२०जुन २०२४ ला गट अ वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र शासन.प्राथमीक आरोग्य केंद्र पिंपळगाव टप्पा ता.पाथर्डी येथे नियुक्ती झाली.आई वडिलांनी शेतात काम करून आपल्या मुलाला शिक्षणासाठी पैशाची पुरतता केली.डॉ.सोहेल यांनी आईवडील व मोठा भाऊ (सय्यद रियाज) यांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून मेहनतीने, जिद्द, चिकाटीने अभ्यास करून आपल्या आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. डॉ.सोहेल यांचा आई-वडील,भाऊ आणि परिवार, तसेच नातेवाईक यांना खुप आनंद झाला.यांच्या या यशाबद्दल डॉ.सोहेल यांचे सर्व स्तरांतून अभिंनदन आणि कौतुक होत आहे.