
हातगाव प्रतिनिधी
पैठण येथे कृषी जगत् परिवाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेणारे श्री रामेश्वर सुसे यांना दैनिक आधुनिक केसरी च्या वतीने ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
काल दिनांक २२ जुलै रोजी मिथिकल पार्क वेरुळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते तसेच प्रसिद्ध कवी दासू वैद्य, ललित लेखक इंद्रजित भालेराव, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षा डॉ उज्वला दहिफळे व दैनिक आधुनिक केसरी चे संपादक श्री गोरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार श्री सुसे यांना प्रदान करण्यात आला.
रामेश्वर सुसे हे मुळचे शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील रहिवासी असून व्यवसाया निमित्ताने ते पैठण येथे स्थायिक झाले आहेत, कृषी जगत् या फर्म च्या माध्यमातून त्यांनी फळबाग लागवड- व्यवस्थापन या बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत पैठण तालुक्यातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांना फळबागाच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग दाखवला आहे, या कार्या साठी दैनिक आधुनिक केसरी च्या वतीने कृषी क्षेत्रातील आयडॉल ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार देऊन सुसे यांचा गौरव केला आहे.
हातगाव चे सरपंच श्री अरुण भाऊ मातंग, उपसरपंच नंदाताई बर्गे, माजी सरपंच राजेंद्र पाटील भराट, ग्रामपंचायत सदस्य डॉ निलेश मंत्री, श्री संजय गलांडे,श्री जिजा ठोकळ, बाळासाहेब सुसे, सुरेश अभंग आदींनी श्री रामेश्वर सुसे यांचे अभिनंदन केले आहे.