
बोधेगाव प्रतिनिधी
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तरी ओलांडली असून सुद्धा या महाराष्ट्रातील ओबीसी समाज अनेक बाबीपासून आजही खूप दूर असून फुले, शाहू, आंबेडकऱ्यांच्या महाराष्ट्रात अजूनही ओबीसीच्या समाज बांधवाची मोठ्या प्रमाणात वाताहात होत असल्याचे मत ओबीसीचे नेते प्रा.लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले आहे.ओबीसी योद्धे प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी एकत्र येत ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा राज्यात सूरू केली असून शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे आलेल्या या यात्रेचे लाडजळगाव फाट्यापासून ते श्री साध्वी बन्नोमा दर्गापर्यंत सर्व ओबीसी सकल समाज बांधवानी हाके व वाघमारे यांची रॅली काढली होती. नंतर दोघांनीही श्री साध्वी बन्नोमाचे दर्शन घेऊन दरग्यात आयोजित कार्यक्रमात प्रा. हाके बोलत होते. या वेळी बोलताना ते म्हणाले की, संविधानात त्या वेळी जे आरक्षण काही विशिष्ट जातींना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहे. ते त्या वेळच्या परस्थितीनुसारच दिले असल्याने आता मराठा समाज बांधवाचा जो आरक्षणासाठी लढा सूरू आहे तो ओबीसीच्या आरक्षणतूनच मागितला जात असल्याने तो आम्ही कदापिही यशस्वी होऊ देणार नाहीत.त्यासाठी राज्यातील ओबीसी समाज पाहिजे ती किंमत मोजायला तयार आहे असे सांगून प्रा. हाके म्हणाले की,जे कोणी मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत ते उपोषण स्थळावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून शासनकर्त्यांना शिवराळ भाषा करत असल्याने ते चुकीचे असून ओबीसीच्या आरक्षणातून दिल्या जाणाऱ्या आरक्षणामुळे त्याचा भटक्या – विमुक्तासह, दलित समाजालाही फटका बसणार आहे असेही म्हटले आहे. तसेच सन १९९४ पासून मंडल आयोगाची अंमलबजावणी सूरू झाली असून ओबीसी आरक्षणावर मात्र ७० वर्षाचा आरोप करून दिशाभूल सूरू केली असल्याचेही शेवटी प्रा. हाके यांनी म्हटले आहे.यावेळी हाके व वाघमारे यांच्या समवेत दीपक बोऱ्हाडे, बळीराम खटके, प्रा. वीरकर, शिवाजी टेहले, तुकाराम वायाळ, अनुज चपटे, सचिन डोईफोडे, अक्षय आटोळे, व बाळासाहेब बोरकर हे होते या वेळी माजी सरपंच रामजी अंधारे यांनी प्रास्ताविक केले असून कांबीचे बाजीराव लेंडाळ यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले आहेत.या वेळी बोधेगावसह परिसरातून माणिक गर्जे, केशव खेडकर, धोंडीराम मासाळकर, भीमराव बनसोडे,भागवत शिंगाडे, शिवाजी खेडकर, नवनाथ खेडकर, शहादेव गुंजाळ, अजिनाथ मासाळकर, महादेव दराडे, महादेव काळे, पोपट अभंग, बाळासाहेब ढाकणे, प्रकाश गर्जे, देविदास पगारे, विठ्ठल वारकड, शशिकांत खेडकर, अजिनाथ वाघ, सचिन वाघ, विष्णू वीर, भगवान वीर, रामनाथ खेडकर, लहू तोतरे, शेषराव लेंडाळ, शिवाजी होळकर, संतोष ढवाण यांच्यासह असंख्य सकल ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.
शासनाने सगेसोयरेचा जीआर काढला तर मुंबई जाम करू.
बोगस कुणबी नोंदी असतील किंवा सगेसोयरेंचा अध्यादेश असेल, बारा बलुतेदार, अठरा बलुतेदार, भटके विमुक्त यांसह जे २९ टक्के आरक्षण आहे, ते संपवण्याचा घाट इथल्या शासनाने घातलेला आहे. याला आमचा विरोध आहे. हा अध्यादेश आला, तर आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. मुंबईत जाम करू. आम्ही शासन काय करते, याची वाट पाहत आहोत. शासनाने आम्हाला विश्वासात घ्यावे. शासनाने ओबीसींचा आक्रोश, वेदना समजून घ्याव्यात. कुणीतरी झुंडशाही करतो म्हणून तुम्ही त्यांच्या दबावात येऊन जर तुम्ही काही करायला जाल, ते घटनाविरोधी आहे. हे सगळे बेकायदेशीर सुरू आहे. मुख्यमंत्री एका जातीचे नेतृत्व करत नाही, तर बारा कोटी जनतेचे दायित्व तुमचे आहे. तशी शपथ तुम्ही घेतलेली आहे, तुमच्या जबाबदारीचे भान ठेवा, नाहीतर मुंबई जाम करू थेट इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला.