Saturday, April 5, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeराजकीयविकास कामे करणारांनाच साथ द्या - आ. राजळे

विकास कामे करणारांनाच साथ द्या – आ. राजळे

हातगाव प्रतिनिधी रावसाहेब निकाळजे
गेली १० वर्षांपासून तुम्ही दिलेल्या साथीमुळे मी विधानसभेमध्ये आमदार काम करत असताना दोन्हीही तालुक्याचा कधीही दुजाभाव न करता आमदार निधीसह शासनाच्या वेगवेगळ्या योजनेतून जास्तीत – जास्त निधी आणून मतदार संघातील अनेक विकास कामे केली असल्याने विकास कामे करणाऱ्यानाच साथ द्या असे मत आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केले आहे. शेवगाव तालुक्यातील मराठवाड्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या गायकवाड जळगाव येथील गावापासून ते कोजागिरी वस्तीपर्यंत जाणाऱ्या ३५ लाख रुपये किमतीच्या मुरमिकरण व खडीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले नंतर आयोजित कार्यक्रमात आ. राजळे बोलत होत्या. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की, स्व. आमदार राजीव राजळे यांनी पहिल्यांदाच शेवगाव – गेवराई मार्गापासून गायकवाड जळगाव पर्यंतचा रस्ता करून दिला होता याची आठवण करून देत माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांच्यापासून या गावाने राजळे कुटुंबावर सतत प्रेम केले असून अशीच साथ येथून पुढच्या काळातही देत रहा असे आ सांगून आ. राजळे म्हणाल्या की, मी माझ्या आमदारकीच्या काळात या गावातील शेतीचे क्षेत्र ओलिता खाली यावे म्हणून सुमारे दीड ते दोन कोटी रुपयाचे बंधारेही दिलेले आहेत. अजूनही गावातील उर्वरित विकासाची कामे करण्यासाठी येथून पुढच्या काळात मला तुमच्या गावाची साथ हवी आहे. कारण १० वर्ष जे कोणी या भागात कधी फिरकलेच नाहीत ते आता येतील व तुम्हाला काहीही आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतील मात्र तुम्ही विकास कामे करणारांनाच साथ द्या असेही आ. राजळे यांनी म्हटले असून या वेळी भीमराज सागडे,सचिन वारकड,प्रा. भाऊसाहेब मुरकुटे,कसमभाई शेख, राजेंद्र डमाळे,अशोक खिळे,संदीप देशमुख,बबन घोरतळे,जगन गरड, विक्रम बारवकर, लहू भवर, रमेश केसभट,दत्ता केसभट,विष्णू केसभट, अंकुश केसभट, उमेश केसभट, दर्शन झरेकर, बाळासाहेब लवंगे, कैलास केसभट, गणेश गिरी,अशोक केसभट,बाबासाहेब केसभट, सुनिल केसभट, सतिश घोक्षे, परशुराम हुगे, बाळासाहेब केसभट, अनिल केसभट,सा. बा. विभागाचे रामेश्वर राठोड, ठेकेदार बाळासाहेब मुरदारे यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular